आयुर्वेदामध्ये गुळवेलीला फार महत्त्व आहे. करोना काळात प्रत्येकाने काहीना काही मार्गाने गुळवेल म्हणजे अमृता या औषधी वनस्पतीचे सेवन केले आहे. पण ही गुळवेल (Gulvel) आपल्याला कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते याची माहिती प्रत्येकालाच असेल असे नाही. गुळवेल हा ताप, कफ, हाडिताप, मलेरिया, अशक्तपणा यांसारख्या अनेक रोगांवर खूप उपयोगी आहे. गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते.

गुळवेल Gulvel चे महत्व
ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये गुळवेलीला (Gulvel) फार महत्त्व आहे. डेंग्यूच्या तापामध्ये आपल्याला शरीरातील रक्तपेशी कमी होतात, या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुळवेलचे सेवन करणं फायदेशीर ठरते.वजन घटवण्यासह गंभीर आजारांपासून बचाव करते. जर योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केलं तर आपल्याला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. पानाच्या आकाराच्या असलेल्या या औषधी वनस्पतीचा रंग गडद हिरवा असतो.
डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे.
या औषधाच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते. ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते. या वनस्पतीला अमृतवेल असंही म्हटलं जाते. वात, तापानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणे, रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होणे इत्यादी समस्यांवर उपाय म्हणून गुळवेलीचे सेवन करावे. गुळवेलीमुळे आपल्या आरोग्याला कशा पद्धतीनं फायदा होतो, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
गुळवेलमधील Gulvel पोषणतत्त्व
गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील (gulvel) इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
डेंग्यू आजारावर गुळवेल रामबाण उपाय आहे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात. यामुळे मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. गुळवेलीतील पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त पेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते. गुळवेलीमुळे पचनाशी संबंधित असलेल्या समस्याही कमी होतात. उदाहरणार्थ जुलाब, अतिसार इत्यादी समस्यांपासून सुटका होते. गुळवेलीमुळे पचनप्रक्रिया मजबूत होते.
न्यूमोनियाची लक्षणे कमी करते नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे. या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात ‘अमृतकुंभ’ म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.